माजी आयपीएस अधिकाऱ्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप

0

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकातून त्यांचे नाव न घेता गंभीर आरोप लावले आहेत. येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन त्यांनी यांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह धरला होता, असा दावा त्यांनी पुस्तकात केला आहे. या आरोपामुळे विरोधाकांच्या हाती मुद्दा सापडला आहे.
मीरा बोरवणकर या पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे. कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. हे लिहितांना त्यांनी अजित पवार यांचे थेट नाव घेतलेले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. तत्कालीन पालकमंत्र्यांनी बोलावल्यावर झालेल्या चर्चेत आपण जागा देण्यास नकार दिला. येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने भविष्यात इतक्या मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला जागेची गरज आहे. नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. परंतु, त्यांनी आपले काहीही ऐकून न घेता जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला, असे बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले आहे. येरवडा कारागृहाशेजारील पोलिसांची तीन एकर जमीन खासगी बिल्डरला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा