
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आणखी काही नेते अजित पवार गटात सामील होणार असून त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा, असा दावा मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे. (Minister Shambhuraj Desai) महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
देसाई म्हणाले की, राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे. हे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा. दसरा-दिवाळीत यावेळीही मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे, असे ते म्हणाले.
