एमपीएससी परीक्षांची तारीख बदला-आमदार सत्यजीत तांबे

0

मुंबई: एमपीएससीच्या  MPSC परीक्षांची तारीख बदलण्यात यावी, असी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. एमपीएससीची उपनिरीक्षक पदासाठीची, नगरपरिषद भरती आणि  MAHAJOTI ‘महाज्योती’तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा या तीनही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या आखत्यारितील परीक्षांची तारीख बदलावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे. (MPSC Exam Schedule)
२९ ऑक्टोबर रोजी राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची उपनिरीक्षक पदांसाठीची परीक्षा आहे. याच दिवशी नगर परिषद भरती परीक्षाही आयोजित करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षाही याच दिवशी होणार आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण-तरुणी एकाच वेळी विविध परीक्षांसाठी अर्ज करत असतात. मात्र या तीनही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एकाच वेळी या तीन परीक्षा कशा देणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा