प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

0

 

अकोला AKOLA :  अकोला येथे महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महिलेचा प्रियकर हा तिच्यापेक्षा २० वर्षांनी लहान आहे. (Akola Murder Case) पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. त्याचा काही दिवसांच्या तपासानंतर छडा लागला.
अकोल्यातील आकोटफैल पोलीस ठाण्याच्या  Akotfail Police Station हद्दीतील उगवा गावातील शिवारात १२ ऑक्टोबर रोजी गवताच्या कुरणात अनोळखी मृतदेह सापडला होता. हा मृतदेह कुजला होता. या व्यक्तीच्या डोक्यावर, छातीवर धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. त्यांची ओळख पटत नसल्याने पोलिसांना तपास करता येत नव्हता. तपासात खून झालेली व्यक्ति ही विद्यावान प्रधान (वय ५०) नावाचा इसम असल्याचे समजले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरल्यावर हा प्रकरणाचा छडा लागला व या प्रकरणात त्याची पत्नी कंकूला विद्यावान प्रधान (वय ४०), लकी श्रवण तेलंते (वय २४ रा अकोला) या दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याला एक मुलगा होता. विद्यवानच्या दारुच्या व्यसनापायी त्याच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याचा राग धरुन कंकूलाने सूड घेण्याचा निर्णय घेतला होता. मुलाच्या मृत्यूनंतर दोघेही वेगवेगळे राहत होते. विद्यावान हा कामधंदा करत नव्हता तर कुंकुला ही एका हॉटेल मध्ये काम करायची. तेथे तिची ओळख लकी तेलंते या २० वर्षीय तरुणाशी झाली व त्यांच्यात प्रेमसंबंध जुळल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी विद्यावानचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. लकीने विद्यावानच्या दारुच्या व्यसनाचा फायदा उचलत २४ सप्टेंबर रोजी त्याला एका शेतात दारु पिण्यासाठी बसवले. त्यानंतर रात्री दारुच्या नशेत त्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार करून त्याला ठार केले. पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केल्यावर त्यांनी मृतकाच्या पत्नीवर संशय व्यक्त केला होता. सुरुवातीला लकीला अटक करण्यात आल्यावर त्याने गुन्ह्याची कबुलीच दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा