सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार ? – मनोज जरांगे पाटील

0

 

जालना- सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार ? असा रोखठोक सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती बरी आहे, मात्र,सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार हे मात्र समजायला तयार नाही. सरकारने आरक्षण जर या अगोदर दिलं असतं, तर आमच्यावर ही वेळच आली नसती.
सरकारने आमच्यावर पूर्वीपासूनच अन्याय केला. आता त्यांनी हे थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल. आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली. खरेतर त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही दिला नाही आरक्षण द्यावं लागेल.
मुख्यमंत्री साहेब नक्की देतील असा विश्वास आहे. मात्र,चाळीस दिवसानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. ही खदखद अनेक वर्षांपासूनची आहे. आता संताप बाहेर पडत आहे.
ज्यांना आम्ही प्रतिष्ठित समजत होतो, ते चिल्लरपणा करायला लागलेत. मुळात पैसे कमवण्यासाठी आंदोलन नाही, न्याय देण्यासाठी आंदोलन आहे. त्यांना वाटलं, आम्ही जमीनच विकत घेतली. आमचे कपडे प्रस्थापित लोकांमुळेच फाटले.भुजबळ साहेब यांना व्यक्तिगत विरोध नाही.आम्हाला टीका करायची, म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. पण आरक्षणाला विरोध केला तर कुणालाच सोडणार नाही. ग्राउंड लेव्हलवर मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधव एकत्र आहोत. काही आमचे आणि काही त्यांचे दोन तीन जण जमू देत नाही असा उपरोधिक टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा