ऑनलाईन जुगारातून दीड कोटी, उपनिरीक्षक निलंबित

0

पुणे-ऑनलाईन जुगारातून करोडपती झालेला पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. (PSI Suspended for Online Gambling) उपनिरीक्षक झेंडे याला ऑनलाईन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये तब्बल दीड कोटी रुपायांचे बक्षिस लागले होते. त्याच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला असून त्याचे निलंबन करण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे परवानगी नसताना सोमनाथ ऑनलाईन गेम खेळला व त्याने गणवेशातच माध्यमांना मुलाखत दिली. त्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवला गेलाय.
सुरुवातीला दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु, त्यांचा आनंद हा फार काळ काही टिकू शकला नाही. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्यांची चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे या करत होत्या. सोमनाथ झेंडे याला अनेकदा पोलिस आयुक्त चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर त्यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचं निलंबन झाल्यानंतर त्याला विभागीय चौकशीत स्वतःच म्हणणे मांडण्याची मुभा मिळणार आहे

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा