समृद्धीवरील तो चालक, बस जप्त,गुन्हा दाखल

0

नागपूर -हेडफोन घालून गाडी चालविताना व्हिडीओ पाहणारा चालक जळगाव आरटीओ कार्यालयाने शोधून काढला आहे. जळगाव आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्यासह त्यांच्या पथकाने संबंधित खाजगी बस चालकावर कारवाई केली असून सदर खाजगी बस जप्त केली असून चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे-नागपूर महामार्गावर धावणारी ट्रॅव्हलची ही बस जळगाव आरटीओ यांनी जप्त करीत तिचा परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे, तसेच संबंधित बसचालकाचा परवाना निलंबनाची कारवाई पुणे आरटीओ कार्यालयात
सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. एक खासगी बसचालक कानात हेडफोन घालून समोर स्टेअरिंगवर मोबाइल ठेवून व्हिडीओ पाहून समृद्धी महामार्गावर बस चालवीत असल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ १५ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बसचा शोध घेतला. ही खासगी बस पुणे-नागपूर महामार्गावर धावणारी जळगावच्या संगीतम ट्रॅव्हलची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जळगाव चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्यासह पथकाने ही खासगी बस जप्त केली तसेच या बसचे परमिट निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर चालकाविरुद्ध बुलढाणा येथील आरटीओ कार्यालयाच्या वतीने मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा