व्हीव्हीआयपी कॉल करून खंडणी; तिघांना अटक

0

नांदेड -सीमबॉक्स कार्यप्रणालीद्वारे समांतर टेलिकॉम एक्सचेंज चालवून अनाधिकृतपणे व्हीव्हीआयपी कॉल करुन खंडणी उकळणाऱ्या अंतराज्य टोळीतील तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव,पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती.

कंधार येथील एका व्यापाऱ्याला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन एक व्यक्ती कॉल करुन हॅरेसमेंट करुन खंडणीची मागणी करीत होता.व्यापाऱ्याने कंधार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सदर मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केल्या नंतर सदर मोबाईल क्रमांक हे सिमबॉक्सचा वापर करून व्हीआयपी कॉलद्वारे कॉल करीत होते.सदर सिमबॉक्समध्ये प्रिपेड कार्डचा वापर करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले.सखोल तपास केला असता त्या सिमबॉक्सचे लोकेशन कर्नाटक राज्यातील दांडेली येथे मिळून आले. या लोकेशनवरुन सियाबुध्दीन अब्दुल रहेमान, जयेश अशोक बेटकर दोघे रा. दांडेली जि. कारवार राज्य कर्नाटक, राशिद अब्दुल अजीजनोटटानवीडन रा. कटाडी मोतेडम पोस्ट Essaकरा ता. निलंबुर जि. मल्लपुर राज्य केरळ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहा सिम्बॉक्स १ हजार २४४ सिमकार्ड, ५ राऊटर, लॅपटॉप, व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर आरोपी एअरटेल कंपनीचे सिमकार्डचा वापर करून अंतरराष्ट्रीय कॉल अप,सॉफ्टवेअर व्हीआयपीचे जीएसएममध्ये रुपांतर करुन खंडणी वसूल करीत होते. सपोनि चंद्रकांत पवार, सपोनि आदित्य लोणीकर, सपोनि राम केंद्रे, उपनिरीक्षक दशरथ आडे, दत्तात्रय काळे, गजानन दळवी, नदीम डांगे तसेच स्थानिक गुन्हा शाखा, विशेष पथक, सायबर सेल, वजिराबाद व कंधार पोलिस स्टेशनतर्फे संयुक्तिक कारवाई करण्यात आली अशी माहिती श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा