
(Buldhana)बुलढाणा – देशभरात सर्वत्र नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात आई जगदंबेच्या मंदिरात मागील 8 वर्षापासून दीपप्रज्वलनाची परंपरा लाभलेली असून 2015 साली दीपगृहात 100 नंददीप भविकांकडून पेटवण्यात आले होते. यावर्षी 1500 नंददीपांच्या ज्योति उजळून निघाल्या आहेत. बुलढाणा शहरापासून 8 किलोमिटर अंतरावर असलेल्या सव येथील आई जगदंबा देवी संस्थानमध्ये नवरात्रीत भाविकांची मोठी रांग पहायला मिळते. मंदिराला प्रदीर्घ इतिहास लाभला असून हे मंदिर पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले होते.
काही काळानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार झाल. सन 1985 साली मंदिर स्थानिक तुकाराम शेळके यांच्या शेतात साकारण्यात आले. नवरात्र उत्साह दरम्यान जिल्हाभरातून नव्हे तर दूरवरून भाविक मांदियाळी या ठिकाणी जमते. मंदिर परिसरात दोन नंदादिप गृह आहेत. याची सुरुवात 2014 पासून सुरु करण्यात आली होती. प्रथम वर्षी 100 नंदादीप प्रज्वलित करण्यात आले होते. आज रोजी येथील दोन्ही नंदादीप गृहात भाविकांचे एकुण 1500 नंदादीप तेवत आहेत..नवरात्री उत्सवात संपुर्ण नऊ दिवस दीप अखंड प्रज्वलित असतात. यासाठी भाविक दिपपात्रात तेल ओतण्याची सुध्दा सेवा देतात. पुढील वर्षासाठी दिपांची बुकिंग आतापासूनच सुरू झाली असल्याची माहिती (President of the Institute Tukaram Shelke) संस्थानचे अध्यक्ष तुकाराम शेळके यांनी दिली.
https://youtu.be/AssK0YMPyKI?si=EyxU1B-RLN6fywhG
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा