टीम इंडियाला धक्का

0

 

हार्दिक पांड्याला दुखापत

(Pune)पुणे: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
पुण्यात बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्या दुखापत झाल्याने ( Indian team)भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Hardik Pandya Injury)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॅनिंग केल्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबतची माहिती समोर येणार आहे. बीसीसीआयने हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर सोशल मीडियावर माहिती दिली आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत मोलाचं योगदान देतो. अशात त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची अडचण वाढणार आहे. दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पांड्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यानंतरच त्याच्या दुखापतीबाबत स्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र यामुळे चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा