विद्यार्थ्यांसोबत संवादातून ऑनलाईन वीज बिल भरण्याचे आवाहन

0
(Nagpur)नागपूर– शाळकरी विद्यार्थ्यांना एखादी नवीन माहिती सांगितली की ते लगेच घरी जाऊन ती माहिती आपल्या आई-बाबाला, भाऊ-बहिणी यांना सांगतात, त्या माहितीचा वापर करायला प्रयत्न करतात, शिवाय आजचा विद्यार्थी हा उद्याचा कर्तव्यदक्ष नागरिक आहे, हे लक्षात घेत महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी जिल्हा परिषद शाळांतून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वीजबिल भरणा व इतर सुविधांबाबत माहिती आणि मार्गदर्शन शिबिराचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे.
ऑनलाईन वीज बिल भरण्याची प्रक्रीया, ऑनलाइन वीजबिल भरण्याचे फ़ायदे, त्यामुळे वाचणारा वेळ, खर्च आणि शारिरिक श्रम आदी विषयांवर विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधून राजेश नाईक यांनी खापरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांच्या शंकांचे समाधान केले, प्रश्नोत्तरे, छोट्या-छोट्या उदाहरणांतून त्यांना ऑनलाईन वीज बिल भरणा आणि महावितरणच्या इतर ग्राहकोपयोगी सुविधांचे महत्व विषद केले. या शिबिरानंतर अनेक विद्यार्थ्यांनी यापुढे आमच्या घरचे वीजबिल ऑनलाईन पद्धतीनेच भरणार असा मानस देखील व्यक्त केला. याप्रसंगी (Deepali Madelwar, Executive Engineer, Savner Division) सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, (Mangesh Kahale, Deputy Executive Engineer, Khaparkheda)खापरखेडाचे उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाले यांच्यासह अभियंते, कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.
https://youtu.be/AssK0YMPyKI?si=EyxU1B-RLN6fywhG
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा