कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही: नारायण राणे

0

 

(Mumbai)मुंबई: मी 96 कुळी मराठा आहे आणि कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही, असा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे आहेत व मी आयुष्यात कुठलाच कुणबी दाखला घेणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे मराठा समाजातील अंतर्गत द्वंद आगामी काळात समोर येण्याची चिन्हे दिसून येत आहे. (Narayan Rane on Maratha Reservation Issue)

मराठा आणि कुणबी याच्यात फरक आहे. (Manoj Jarange) मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा. जातीला किंवा वर्गाला आरक्षण देताना घटनेचा अभ्यास करावा लागतो. मी भरपूर अभ्यास केला आहे, त्यामुळे मला माहिती आहे, घटना काय सांगते. मी मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको. कुठलाही मराठा हा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी इस्त्रालय आणि हमास बाबत केलेली टीका चुकीची आहे. इस्त्रायलवर दहशतवादी हल्ल्याबाबत मोदींनी भूमिका मांडली होती. पॅलेस्टिन विरोधातली ती भूमिका नव्हती.

हमासचे कौतुक करणाऱ्या शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगले काम केलेलं दिसत नाही का, असा थेट सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला.
शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी ना देशाच्या हिताचे बोलतात ना समाजाच्या हिताचे अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवारांना मोदी विरोधाची काविळ झाल्याने त्यांनी केलेली चांगली काम त्यांना दिसत नाहीत असे नारायण राणे म्हणाले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा