
(Nagpur)नागपूर, 19 ऑक्टोबर
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र हनुमाननगरचे अध्यक्ष, विदर्भ ज्येष्ठ नागरिक महामंडळचे खंदे कार्यकर्ते, रा.स्व.संघ हनुमाननगर शाखेचे ज्येष्ठ स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते भगवान उर्फ (Mama Mundhe) मामा मुंढे यांना विदर्भ ज्येष्ठ नागरिक महामंडळतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रद्धांजली सभेला, त्यांच्याच अथक प्रयत्नातून साकार झालेल्या विरंगुळा केंद्रात बहुसंख्य नागरिक आणि अनेक संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थिती होते.
ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ तर्फे एड. अविनाश तेलंग, शिक्षण मंच व गृहिणी समाज तर्फे (Dr. Kalpana Pandey)डॉ कल्पना पांडे, (Mrs. Patil on behalf of Buldhana District Citizens Board)बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ तर्फे सौ पाटील यांनी, देवेन दस्तुरे यांनी भाजप तर्फे, “प्रहार “तर्फे संदीप तिजारे, सावित्रीबाई फुले संस्थेतर्फे डॉ पहाडे, ज्ये. ना. मंडळ हनुमाननगर तर्फे दिनेश देशमुख तर रा.स्व. संघ तर्फे ज्ञानेश्वर बालपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

(Kishore Pohekar)किशोर पोहेकर यांनी स्वरचित कविता सादर केली. प्रा. प्रभुजी देशपांडे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी स्व. मामांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा सर्वांनी उचलावा आणि त्यांचे कार्य पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे,असे सांगितले. (Ram Dhond)राम धोंड यांनी सभेचे संचालन केले. शांती मंत्राने सभेची सांगता झाली.