मविआविरोधात भाजपचे आंदोलन

0

 

अमरावती- राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती केल्यावरून राज्यभरात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांनी आंदोलनाचे अस्त्र उभारल्यानंतर काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटीकरणाचा निर्णय रद्द केला.

BJP’s agitation against Maviya त्याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी हा कंत्राटीकरणाचा भरतीचा जीआर काढला असल्याचा आरोप करत शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारत महाविकास आघाडीचा निषेध केला. यावेळी माजी मंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये या आंदोलनात सहभागी झाले होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा