
श्रीहरीकोटा, २१ ऑक्टोबर : ‘गगनयान’ मोहिम उड्डाण चाचणी आधी रद्द झाल्यामुळे काहीशी निराशा आली होती, मात्र इस्रो वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे अखेर चीज झाले आणि गगनयान मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी झाली. या यशस्वी चाचणीमुळे भारताने अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला असून तो जगात चौथा देश ठरला आहे. Gaganyaan flight test successful, India becomes 4th country
आज, शनिवारी सकाळी दोन वेळा थांबवण्यात आलेली मोहिम १० वाजता इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी उड्डाण करण्यात आले. यालाच टेस्ट व्हिकल अबॉर्ट मिशन 1 (Test Vehicle Abort Mission 1) आणि टेस्ट व्हिकल डेव्हलपमेंट फ्लाईट (TV-D1) असेही म्हणलं जात आहे. Gaganyaan Mission: GSLV’s First Test Flight For India’s Human Space Mission Delayed

दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात आले. या चाचणीत मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश २०२५ मध्ये तीन दिवसांच्या मिशन अंतर्गत अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० किमीवरच्या कक्षेत पाठवलं जाणं आणि नंतर सुरक्षित पृथ्वीवर परत आणणं आहे. यामध्ये रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणारी क्रू एस्केप सिस्टम (Crew Escape System) चाचणी करण्यात आली. अशा मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.