
मुंबई MUMBAI : राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कंत्राटी भरतीबाबत बेरोजगार तरुणांमध्ये (Job Recruitment) त्यांच्या नोकऱ्या जाणार, अशा पद्धतीचा गैरसमज विनाकारण पसरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याधी कुणाच्या काळात कशा पद्धतीने नोकर भरती झाली, याविषयी काल सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून वस्तुस्थिती समोर आली आहे. आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि लवकर भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नव्हती, असेही अजित पवार म्हणाले. Opponents spread misconceptions about contractual recruitment
काल फडणवीस यांनी जीआर मागे घेण्याची घोषणा करताना हा जीआर उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे पाप असल्याचे सांगत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. भाजपने देखील यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कंत्राटी भरतीचे जीआर महाविकास आघाडी सरकारने काढले असताना त्याचे आरोप विरोधकांनी भाजपवर लावले, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.
