मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

0

मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. तसेच यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच. नांदेडमध्ये (Nanded) आणखी एका तरुणाने आरक्षणसाठी आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका अशी चिठ्ठी लिहीत या तरुणाने आत्महत्या केली आहे.

तीन दिवसांपूर्वीच सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना याच मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे शुभम पवार याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली. शुभमच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा