महान गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे निधन

0

 

नवी दिल्ली : आपल्या स्पीनने प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडविणारे महान गोलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताचे दिग्गज डावखुरे स्पिनर बेदी यांनी 1967 ते 1979 दरम्यान भारतासाठी 67 कसोटी खेळत 266 विकेटस घेतल्या. त्याचबरोबर त्यांनी 10 एकदिवसीय सामन्यांत सात विकेट्स घेतल्या. बेदी यांनी इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस वेंकटराघवन यांच्यासमवेत भारतात फिरकी गोलंदाजीचा पाया घातला.
बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर येथे झाला. 30 ऑगस्ट 1979 रोजी बेदी यांनी इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बेदी यांनी 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यापैकी टीम इंडियाने 6 जिंकले आणि 11 हरले. 5 टेस्ट ड्रॉ झाल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 4 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा