
जळगाव : मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे हातघाईवर येऊ नका, असा सबुरीचे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मनोज जरांगे यांनी दिलेली मराठा आरक्षणाची मुदत उद्या संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला यापुढे वेळ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी हे आवाहन केले आहे. (Girish Mahajan on Maratha Reservation Issue)
गिरीश महाजन म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत शासन अतिशय सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा घाई गर्दीत करण्याचा विषय नाही. त्याला थोडा वेळ लागू शकतो. मराठा आरक्षण टिकले पाहिजे, या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. पुन्हा मराठा समाजाची निराश होऊ नये, यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्यामुळे चाळीस दिवस झाले आता एक तासही देणार ना, अशा पद्धतीने भूमिका घेऊ नका, हात घाईवर येऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.