
पुणे : पोलिस भरतीचे आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. (Pune Girl rape) एका तरुणावर याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पीडित तरुणी पोलीस भरतीची तयारी करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही वानवडीतील एका संस्थेत जायची. तेथे तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्याने तो राजपत्रित अधिकारी असल्याची बतावणी पीडित तरुणीला केली होती.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा