सोलापूर लोकसभेतून प्रणिती शिंदेंची उमेदवारी

0

सोलापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या व आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. आपण राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील व मला शक्य ती सर्व मदत मी त्यांना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. (Praniti Shinde to contest Solapur Lok Sabha)
सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला अभिवादन केल्यावर त्यांनी यावर भाष्य केले. शिंदे म्हणाले की, बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला दिली, त्या घटनेचा इतका जयजयकार झाला की त्या घटनेनुसारच आज देश चालतो आहे. बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आता कुठल्या पक्षाला राजकारणदेखील करता येत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा