गोळीबार चौकात माय दंतेश्वरी महाआरती व दसरा उत्सव साजरा

0

NAGPUR प्राचीन बस्तरच्या दंतेवाडा या  नगरीत माय दंतेश्वरीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. आदिम हलबा या आदिवासींची कुलदैवत व आराध्य दैवत म्हणून माय दंतेश्वरी झाली.  माय दंतेश्वरी समोर आदिम हलबा बांधव दसराच्या दरम्यान दसरा उत्सव  साजरा करतात. आदिम हलबा आदिवासींनी प्राचीन काळापासून बिलाई माता किंवा माय दंतेश्वरी समोर नरबळी देण्याची आदिवासी प्रथा बंद होऊन पशु बळीवर आली. आदिम हलबा हि जमात बस्तरवरून विदर्भात येऊन बसल्याने  माय दंतेश्वरीचे विदर्भात माता माय म्हणून पूजा करतात. हलबा आदिवासींतमाय दंतेश्वरीवर अतूट श्रद्धा असल्याने नागपूरातील गोळीबार चौकाजवळ माय दंतेश्वरीची स्थापना करून दसरा दरम्यान नवरात्राच्या दिवसात दसरा उत्सव करण्यात येत आहे. या उत्सवादरम्यान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी माय दंतेश्वरी महाआरती झाली. यावेळी प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस

ॲड.  नंदा पराते ,काँग्रेसचे जेष्ठ नेते दिपक काटोल, उमेश डांगे, प्रदेश सचिव राजा तिडके,गिरीश पांडव ,शहर काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णा गोटेफोडे,रमण पैगवर,पिंटू बागडी,पुरुषोत्तम गौरकर ,माजी नगरसेवक राजू तंबूतवाले,मंडळ अध्यक्ष  चंद्रशेखर बावने,सुनील दहीकर,अशोक निखाडे, सह मान्यवर माय दंतेश्ववरीच्या महाआरतीस उपस्थित होते.
आदिम नेत्या ॲड. नंदा पराते यांच्या मार्गदर्शनात माय दंतेश्वरी दसरा उत्सव होता. या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजीत करून आदिवासी पध्दतीने महापूजाचा कार्यक्रम संपन्न होतो. गोळीबार चौकातील या उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमाने हजारो हलबा बांधव माय दंतेश्वरीची पूजा करतात.
आदिम नेत्या ॲड. नंदा पराते यांच्या मार्गदर्शनात युवक व महिला दसरा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मंजू पराते,अतूल सदावर्ती,स्नेहल दहीकर ,सचिन बोरीकर,शुभम शेंडे,मंजूषा पराते,अनिता हेडाऊ,धनंजय सदावर्ती, लोकेश वठ्ठीघरे ,कल्पना अड्याळकर ,मंदा शेंडे, अनिता हेडाऊ, माया धार्मिक, शकुंतलाबाई वठ्ठीघरे अभिषेख मोहाडीकर,वनिता हेडाऊ यांना अथक परिश्रम घेतले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा