
नागपूर NAGPUR – सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एलईडी लाइट्समध्ये सर्वसाधारणतः निळ्या एलईडीवर गार्नेट नामक पदार्थाचे लेयर चढविले जाते. त्यामुळे निळा व पिवळा रंग मिळून पांढरा रंग होतो. मात्र यात काही अंशी लाल रंगाचा अभाव राहतो. यामुळे या लाईटच्या उजेडात अन्य वस्तूंचा मूळ रंग सहजतेने दिसत नाही. यामुळेच जगभरात सर्वश्रेष्ठ लाल रंग उत्सर्जित करणाऱ्या पदार्थाचे संशोधन सुरू आहे. या मालिकेत नागपूर जिल्ह्यातील कोराडीस्थित तायवाडे महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अभिविलास नखाते डॉ कमलेश डाबरे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्राध्यापक डॉ संजय ढोबळे आणि विद्यार्थी प्रशांत पराळे व अभिजीत कदम यांना फास्पाईट हा काचेचा पदार्थ बनवण्यात यश मिळाले आहे.
ही काच निळ्या रंगाला अवशोषित करून तीव्र केसरी व लाल रंग उत्सर्जित करतो. या संशोधनाला रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे.नागपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब म्हणता येईल. या संशोधनाबद्दल अभिविलास नखाते आणि सर्व चमूवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
