
जालना JALNA – माझ्या हातून तुम्ही चांगले कोम होऊच देत नाही.आमचं काय चुकलं आहे ? २ दिवसात गुन्हे मागे घेणार होता त्याचे काय? अजून गुन्हे मागे घेतले नाही आरक्षण कसं देणार. आता उपोषण सुरु झाल्यावर नेत्यांसोबत बोलणारही नाही असा कडक इशारा मराठा समाजाचे नेते Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. आजपासून पुन्हा त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
सारथीचे मुलं आंदोलन करत आहेत, तुम्ही काय करताय.तुम्ही काय मार्ग काढलाय ते सांगा. आम्ही तुम्हाला वेळ दिला तुम्ही काय केले असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केला. आजपासून सुरु झालेले उपोषण अत्यंत कडक असेल. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाशिवाय आता थांबणार नाही. ४१ दिवस झाले तरी सरकारकडून अजून कोणताही निर्णय झालेला नाही.आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही. आमच्या वेदना लक्षात येऊनही सरकारने आरक्षण दिले नाही. काल संध्याकाळपर्यंत आरक्षण मिळेल अशी आशा होती. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मात्र,कुणीही आत्महत्या करु नका,कोणीही उग्र आंदोलन करु नका असे आवाहन करतानाच आरक्षण मिळविण्यासाठी जिवाची बाजी लावणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे
