ठाकरे? छे ! हे तर इंडिया आघाडीच्या प्रवक्त्याचे भाषण! चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

0

नागपूर NAGPUR – काल उद्धव ठाकरे यांनी केलेले रटाळ भाषण होते, देश मोदींना कुटुंब मानतोय, मोदींना परिवाराचा प्रमुख अशी भावना आहे. इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे गेले आहेत, त्यामुळे ते शरद पवार आणि काँग्रेसचे वकील आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष  CHNDRASHEKHAR BAWANKULE  चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. स्टालिन यांच्या वक्तव्यावर खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला नाही. उलट स्टालिन यांच्यासोबत जाऊ हे पुन्हा रेटून सांगितले. विकासाचे मुद्दे UDHAV THAKARE उद्धव ठाकरेंकडे नाही. व्हिजनलेस व्यक्ती राजकारणात असताना जनतेला कन्फ्युज करत आहे. खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यांना काही आठवत नाही. यामुळेच कालचे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांचे भाषण होते. विकासाचे उद्धव ठाकरेंना काहीही कळत नाही. 2047 पर्यंत आता सर्वांनी वाट बघावी. बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवले असा आरोप केला.

निलेश राणे यांच्या नाराजीबाबत बोलताना जीवनात अशी घटना होते, जेंव्हा काहीशी निराशा येते. मी स्वतः रत्नगिरीत जाऊन आलो. निलेश राणे चांगले नेते आहेत.
छत्रपती शिवरायांना साक्षी मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. आम्हाला अभिमान आहे, मराठा समाजाने मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले पाहिजे. मनोज जरांगे उपोषण करताहेत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे जबाबदार नेते छत्रपतींच्या साक्षीने वचन देत आहेत तर जरांगे पाटलांनी थोडी वाट पाहावी असे आवाहन केले.
गावबंदी संदर्भात, जर महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि नेते आरक्षणाच्या बाजूने आहेत, एकमुखाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत, तर मग गावबंदी करून काय फायदा? जरांगे पाटलांनी यावर विचार करावा असा सबुरीचा सल्ला दिला.
दरम्यान,पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्यांच्या बोलण्यात काही वेगळे नाही. पक्ष,केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल. त्या आमच्या नेत्या आहेत. भाजप त्यांच्या मागे उभा आहे.
असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा