डॉ. गजानन जयस्वाल यांना नवसंशोधनासाठी पेटेंट

0

 

महावितरणचे कार्यकारी अभियंता
(Dr. Gajanan Jaiswal)डॉ. गजानन जयस्वाल यांना नवसंशोधनासाठी पेटेंट

(Nagpur)नागपूर :महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल यांना स्टेटस मॉनिटरिंग अँपरेटस फॉर रिऍक्टर अँड ट्रान्सफॉर्मर (स्मार्ट) या विषयावरील नाविण्यपूर्ण संशोधनाला पेटेंट प्राप्त झाले असून यापूर्वीही त्यांच्या नाविण्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारचे पेटेंट प्राप्त झाले आहे.

स्टेटस मॉनिटरिंग अँपरेटस फॉर रिऍक्टर अँड ट्रान्सफॉर्मर (स्मार्ट) या विषयावरचे नाविण्यपूर्ण संशोधन कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल व विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफटेकनॉलॉजी येथील डॉ. मकरंद बल्लाळ यांनी सादर केले होते. या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने 23 ऑक्टोबर 2023 ला पेटेंट प्रदान केले आहे. डॉ. गजानन जयस्वाल यांचे कंडिशन मॉनिटरिंग अँड हेल्थ स्टेटस असेसमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रकाशकाने पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच यापूर्वी डॉ. गजानन जयस्वाल व डॉ. मकरंद बल्लाळ यांनी रिमोट कंडिशन मॉनिटरिंग सिस्टिम फॉर डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर या विषयावरील संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाने 2020 मध्ये पेटेंट प्रदान केले आहे. नव्या या संशोधनामुळे ट्रान्सफॉर्मर व रिॲक्टरच्या हेल्थ स्टेटस ची माहिती आधीच प्राप्त करता येणे शक्य होणार आहे. या संशोधनासाठी डॉ. गजानन जयस्वाल यांना डॉ. मकरंद बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,गोंदिया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी गजानन जयस्वाल यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा