यवतमाळला येणार 5 हजार कोटींचा उद्योग, मुंबईत डायमंड हब-| उद्योग मंत्री उदय सामंत

0

यवतमाळ – महाराष्ट्राच्या डायमंड क्षेत्रासाठी अतिशय मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारने घेतलेला आहे. मुंबईपासून जवळच नवी मुंबईत डायमंड हब करण्याचा आणि डायमंड पॉलिसी देखील आम्ही केलेली आहे. एक वर्षानंतर देशातला सगळ्यात मोठा डायमंड हब हा महाराष्ट्रात नवी मुंबईला असेल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मराठा आरक्षण संदर्भात बोलताना
महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री जो आरक्षणाचा प्रश्न आहे, तो सोडवणार आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. यापूर्वी अनेक मंत्री हे महाराष्ट्राचे देखील केंद्रामध्ये होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेने काहीसुद्धा केले नाही. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासात्मक निधी मिळतो आणि राज्याचा निधी आणण्यासाठी दिल्लीला गेलं तर मला असं वाटतं काही फरक पडत नाही. काही लोक जात नव्हते आणि गेले तरी अँटीचेंबर मध्ये भेटत होते. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जर दिल्लीला जात असतील तर ते महाराष्ट्राच्या विकासाला पुढे नेण्यासाठी जातात आणि विकासाचा निधी त्यांनी आणून दाखवला आहे.
अमरावती विभागामध्ये 770 प्लॉटवर उद्योगामार्फत अजून काही काम झालेले नाही, अशी माहिती मला मिळालेली आहे. त्यामुळे काहीच झालेल नसेल आणि कोणाची काहीच करण्याची मानसिकता नसेल तर ते 770 आणि त्यातले 198 प्लॉट हे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातले फ्लॉट आम्ही परत घेऊ असे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 30 तारखेला यवतमाळमध्ये होतोय. यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये यवतमाळाला फार मोठी गिफ्ट एकनाथ शिंदे देतील. एवढेच या ठिकाणी सांगतो की सरासरी 5000 कोटीचा प्रकल्प असेल असेही जाहीर केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा