
अरनिया आणि आरएसपुरा येथे गोळीबार
जम्मू, 27 ऑक्टोबर: जम्मूच्या अरनिया आणि आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी 26 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. या गोळीबारात एक बीएसएफ जवान आणि चार नागरिक जखमी झाले आहेत.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानने 5 भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाकिस्तान रेंजर्सनी निवासी भागातही मोर्टार डागले. त्यामुळे घरांच्या भिंती कोसळल्या.जखमी सैनिकाला विशेष उपचारासाठी जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 10 दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही दुसरी घटना आहे.यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी विनाकारण गोळीबार केला होता. ज्यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. पाकिस्तानने 25 फेब्रुवारी 2021 पासून, जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त इतर अनेक भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.