
जालना JALNA -मराठा आरक्षणासाठी Maratha Arakshan आंतरवाली सराटी येथे उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपचार, सलाईन, पाणी न घेता कठोर उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. मराठा आरक्षण हाच माझा उपचार असल्याचे ते म्हणाले. (Maratha Reservation Issue)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणाच्या पहिल्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांच्या विनंतीचा मान ठेऊन मनोज जरांगेंनी पाणी घेतले होते. मात्र, आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोवर उपचारही करुन घेणार नसल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केले. डॉक्टरांचे पथक त्यांना तपासण्यासाठी आले होते. परंतु, त्यांनी पथकाला परत पाठवले.
दरम्यान, वाहनांच्या तोडफोडीत आमचे कार्यकर्ते सहभागी नसल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. आमचे कार्यकर्ते शांततेत आंदोलन करीत आहेत, असाही त्यांचा दावा आहे.