शासनाच्या धोरणांविरोधात जनआक्रोश मोर्चा

0

 

वर्धा WRDHA – सरकारी संस्था कंपनीकरण, कंत्राटीकरण, खासगीकरण यासह शेतकरी प्रश्न, जुनी पेन्शन अशा असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता आणि शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता संघर्ष समन्वय समितीने आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.

हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जाऊन याच चौकात गेला. या जन आक्रोश मोर्चामध्ये सीटू आयटक राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक, शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यासह ४० संघटनांचा सहभाग होता. आ सुधाकर अडबाले यांनी नेतृत्व केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा