
नागपूर -महाल भागातील लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या ‘शुभंकरोती’ व ‘स्व. बाबासाहेब आपटे स्मारक समिती’ च्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘भव्य शिवकालिन किल्ले स्पर्धा’ दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केली गेली आहे. यंदाचे हे एकविसावे वर्ष आहे. शिवकालिन, काल्पनिक किंवा टाकाऊ वस्तुपासून केलेले आकर्षक किल्ले, स्पर्धक यात भाग घेऊ शकतात. तीन गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे.
शालेय मुलामुलींचा गट (शिवबाचे मावळे), नागपूर भूषण किल्लेदार या गटात गेल्या 10 वर्षापासुन सातत्याने किल्ला बनविणारे स्पर्धक, मंडळे भाग घेऊ शकतील व तिसरा गट हौशी किल्लेदार या गटात ज्येष्ठ नागरिक, विविध प्रतिष्ठाने, शाळा, हॉस्पीटल,कॉलेज व नवोदित भाग घेऊ शकतील. या स्पर्धत भाग घेण्याची अंतीम तारीख 10 नोव्हेंबर. किल्ले परीक्षण 13 व 14 नोहेंबर रोजी सकाळी 8 पासुन प्रत्यक्ष किल्ल्यावर भेट देऊन होणार आहे व बक्षीस वितरण रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. किल्ले स्पर्धेचे परिक्षक नागपूरातील प्रसिद्ध नेपथ्यकार सुनील हमदापुरे हे राहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी संयोजक मनोज वैद्य, संघ कार्यालय जवळ, महाल, नागपूर येथे संपर्क करावा किंवा 9130911131 प्रतिक पत्राळे यांचेशी संपर्क करावा असे किल्ले स्पर्धा आयोजन समितीतर्फे कळविण्यात आले आहे.
