135 कलाकार 12 तास करणार अखंड घुंगरू नाद

0

 

नागपूर  NAGPUR –धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरतर्फे “अखंड घुंगरू नाद-2023” या शास्त्रीय नृत्य सोहळ्याचे आज, रविवार, 29 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 135 कलाकार 12 तास अखंडपणे कथ्थक, भरतनाटयम्, मोहिनीअट्टम, ओडीसी, कुचीपुडी आदीं शास्त्रीय नृत्य प्रकार सादर करणार आहेत.
श्री विनायकराव फाटक स्मृती सभागृह, धरमपेठ म. पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर येथे सकाळी 7.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सलग 12 तास म्हणजेच सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 135 कलाकार शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा