मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही

0

JALNA मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलं. सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी देऊनही निर्णय न झाल्याने जरांगेंनी हा निर्णय घेतला. आज (२९ ऑक्टोबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी MNOJ JARANGE PATIL  मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याच्या विनंतीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मनोज जरांगे म्हणाले, “गावातील लोकांच्या चुली पेटत नाहीये आणि तेही जेवण करत नाहीये. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आला. मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. परंतु गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आहे.”

मीडियाच्या कॅमे-यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, ‘‘त्यांच्या कानात बोळे घातले आहेत का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाहीत, असे मी म्हणालो आहे. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायला पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाहीत. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा