कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का

0

कोयना धरण KOYANA DHARAN   परिसरात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असतात. आता पुन्हा शनिवारी कोयना धरण परिसरात भूकंप जाणवला. सातारा कोयना नगर परिसरात रात्री 9.06 मिनिटांनी भूकंपाची नोंद करण्यात आली. 2.9 रिश्टेल स्केलचा हा भूकंपाचा धक्का असल्याची नोंद करण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात गोषटवाडी गावच्या पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली सात किलोमीटर असल्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.Earthquake in Koyna Dam area

या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात गोषटवाडी गावच्या पश्चिमेला ७ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली सात किलोमीटर असल्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.
कोयना धरण सुरक्षित

भूकंपाच्या धक्क्यानंतर कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती कोयना धरणावर असलेल्या सिंचन विभागाच्या अधिका-यांनी दिली. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात कुठेही कोणतीही हानी झाली नाही. तसेच कोठेही पडझड झाली नाही. भूकंपाचा हा धक्का सौम्य होता. तो कोयनानगर परिसरातच जाणवल्याचे अधिका-यांनी सांगितले. कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भूकंपांच्या धक्क्यांची रिश्टर स्केलवर तीव्रता कमी आहे. यामुळे कोयना धरणाला कोणतीही हानी पोहोचली नाही.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा