शेतकऱ्यांच्या आर्थिक आरक्षणासाठी आमदार बच्चू कडू यांचा एल्गार

0

 

अमरावती AMRAWATI – शेतकऱ्यांच्या आर्थिक आरक्षणासाठी आमदार BACHU KADU बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला असून आमदार बच्चू कडू हे आज नागपूर वरून अयोध्येला रवाना झाले.मात्र या सर्व आंदोलनावर बोलतांना आमदार बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर बोचरी टीका केली. कुठलाही मतदारसंघ कोणाची मालमत्ता नाही इथे फक्त आमचीच चालते असे कुणी समजू नये .आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कुठेही जाऊ शकतो, कोणाच्याही विरोधात आंदोलन करू शकतो मग तो मतदारसंघ कोणाचाही असो मोदी किंवा योगी यांचाही असला तरी आमचा कोणी बाप नाही शेतकरीच आमचा माय बाप आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करत राहू अशी ठाम भूमिका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा