
छत्रपती संभाजीनगर chatrapati sambhajinagar – सकल मराठा समाज maratha samaj शैक्षणिक मंच व्यासपीठाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर ते आंतरवाली सराटी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली क्रांती चौकातून अंतरवलीकडे रवाना झाली.मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांचे मनोबल वाढावे यासाठी आज सुशिक्षित शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने रॅली काढण्यात आली. शासनाने जे तरुण विद्यार्थी आत्महत्या करत आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जर आत्महत्या करून जर आरक्षण मिळत असेल तर ते आरक्षण कोणाच्या कामाचे असाही सवाल यावेळी उपस्थित केला.