
बुलढाणा BULDHANA : जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या मुळे
ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी प्रत्यक्ष मतदान 5 नोव्हेंबर रोजी होत आहे.
त्या अनुषंगाने उमेदवारांनी गावा गावात प्रचाराला सुरुवात केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासह थेट सरंपच व पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे 59 ग्रामपंचायतीच्या रिक्त थेट सरपंच सदस्याच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणुक होत आहे. प्रचाराला आता सुरुवात झाली आहे.