मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास काही झाल्यास सरकारला सोडणार नाही !

0

 

जालना JALNA  – मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे हे मागील सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या सहा दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीत मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. मनोज पाटील जरांगे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास प्रत्येक घराघरात नथुराम गोडसे तयार होतील असा इशारा MNOJ PATIL मनोज पाटील जरांगे यांच्या मानलेल्या बहीण रेखाताई पाटील REKHA PATIL  यांनी सरकारला दिला आहे. वेळीच योग्य ते पाऊल उचलावे नाहीतर सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा