मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले असते तर बोलले असते-मनोज जरांगे

0

 

जालना- पोलिसांनी मराठी बांधवांना त्रास देऊ नये, तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका.आमच्या वाट्याला गेला तर लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
-क्युरीटी पिटिशन आणि आमचा संबंध नाही…मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले असते तर ते शिर्डी मध्ये नक्कीच मराठा आरक्षणाबाबत बोलले असते यावर
मनोज जरांगे यांनी भर दिला.नारायण गडाचे महंत, महिला भगिनी, गावकरी, मीडिया यांचा मान ठेवून चार ते पाच घोट पाणी पितो, मात्र, यापुढे पाणी पिणार नाही कोणाचेच ऐकणारही नाही असे म्हणत मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतले.

 

सरसकट कुणबी दाखले द्या, अर्धवट आरक्षण नको-जरांगे पाटील

जालना : कुणबी वंशावळी असतील किंवा तत्सम पुरावे असतील त्यांना कुणबी दाखले देण्याच्या निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर जाहीर केला. मात्र, हा प्रस्ताव उपोषणावर असलेले जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला आहे. पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार असल्याचे सांगत सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत, या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. राज्यातला मराठा एकच आहेत. सरसकट आरक्षण द्यावे लागेल. फक्त ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनाच आरक्षण देणे, हे बरोबर नाही. पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार असल्याचं सांगत अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोन आला होता. उद्याच्या उद्या बैठक लावून ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना प्रमाणपत्र देतो, असे त्यांनी सांगितलं. पण फक्त पुरावे असलेल्यांनाच आरक्षण द्याल तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असे त्यांना सांगितल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले असले तरी कोणीही जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा