जरांगे यांच्या उपोषणाला मराठा बांधवांचा पाठिंबा

0

 

अकोला AKOLA  : मराठा आरक्षणाच्या  MARATHA ARAKSHAN मागणीसाठी मनोज जरांगे पाटील MNIJ JARANGE PATIL  यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत.मनोज जरांगे त्यांच्या समर्थनार्थ खामगाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आमरण व साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असून राज्यभर व्यापक लढा लढला जात आहे.मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या या मराठा आरक्षणाच्या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.सरकारने ४० दिवसांचा वेळ घेऊनही मराठा आक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही,त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.त्यांच्या या उपोषणाला राज्यभरात प्रतिसाद मिळत असून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगाव सकल मराठा समाजाच्यावतीने येथील टॉवर चौकात आमरण व साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सद्या सूरू आमरण व साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने सूरू आहे.आज मनोज जरांगे यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे.त्यांची प्रकृती खालावत आहे, आता शांततेचे आंदोलन शासनासोबत दोन हाताचे युद्ध होणार का, ही काळजी महाराष्ट्राला पडली आहे.
गुणरत्न सदावर्ते विचित्र बुद्धीचा माणूस आहे. कायद्याचे ज्ञान त्याला नाही. मराठा समाज बांधव त्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरीसाठी आरक्षण मागत आहे. सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसचा पाळलेला कुत्रा आहे. त्यानी त्याला भुकायला सांगितल तर भुंकतो अशी टीका उपोषणकर्ते किशोर भोसले,प्रवीण कदम यांनी केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा