आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यात तोडफोड, जाळपोळ

0

माजलगाव MAJLGAW  (जिल्हा- बीड) : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे  Manoj Jarange मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल टिप्पणी केल्याबद्दल संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यात घुसून तोडफोड केली व वाहनांची जाळपोळ केली. तुरळक दगडफेकही करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटी यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सुरुवातीला जिल्ह्यात साखळी उपोषणे झाली. मात्र, मागच्या दोन दिवसांत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बसची जाळपोळ, अचानक रास्ता रोको, असे प्रकार होत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मनोज जरांगे यांच्याबद्दलची एक ऑडिओ क्लिप पुढे आल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोमवारी त्यांच्या माजलगावच्या बंगल्यासमोर हजारोंची गर्दी जमली. सुरुवातीला बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यात बंगल्याच्या सगळ्या काचा फुटल्या. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आतमध्ये घुसून चारचाकी वाहनांना आग लावली. आगीनंतर बंगल्यातून ज्वाळा आणि धुरांचे लोट बाहेर निघत होते. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्नीशमन वाहनाचीही आंदोलकांनी तोडफोड केल्याची माहिती आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा