नोंदी सापडलेल्या मराठा बाधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार

0

मुंबई MUMBAI मुख्यमंत्री एकनाथ शिंदे EKNATH SHINDE यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा आरक्षणासंबंधी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीत ज्या मराठा समाजबांधवांकडे कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. (Maratha Reservation) दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यासंदर्भात थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारचा हा निर्णय उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना मान्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यभरातून मराठा समाजही आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने तातडीने बैठक बोलावून हा निर्णय घेण्यात आला. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला आतापर्यंत अनेक नोंदी आढळून आल्या आहेत. ज्यांच्या नोंदी आढळल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत न्या. शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा मांडण्यात आला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, न्या संदीप शिंदे ( निवृत्त), मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, विशेष निमंत्रित मंत्री दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर, समितीचे सदस्य मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, योगेश कदम, भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ , मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा