दिवाळीनिमित्त बाजारात रंगीबेरंगी मातीचे दिवे दाखल

0

 

(nagpur)नागपूर – दसरा संपला की, दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागते. या दिपोत्सवासाठी सगळेच सज्ज झालेले असतात. सुख-समृद्धीचे प्रतीक असलेला हा सण साजरा करत असताना घरात किंवा अंगणात आवर्जून दिवे लावले जातात. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावले जातात.

सध्या मातीचे दिवे अर्थात पणती तयार करण्याची कारागिरांची लगबग सुरू आहे. दिवाळीला अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, शेकडो प्रकारच्या दिव्यांची बाजारात आवक झाली आहे. कॉटन मार्केट, एम्प्रेस मॉल परिसरात बाहेरून मोठ्या प्रमाणात पणत्यांचे वेगवेगळे प्रकार आले आहेत. एका व्यापाऱ्याने सांगितले की, एलईडी दिव्यांची सुरुवात होऊनही मातीच्या दिव्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. बाजारात विविध प्रकारचे दिवे आले असून मातीच्या दिव्यांना हे जास्त दिवाळीत महत्त्व असते. मातीच्या दिव्याला ग्राहकांची जास्त पसंती आहे, असे व्यापाऱ्यांनी देखील सांगितले. सध्या बाजारात वेगवेगळ्या आकाराचे, रंगीबेरंगी दिवे दाखल झाले आहेत.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा