हिंसक आंदोलनातील लोकांवर गुन्हे दाखल

0

(Sambhajinagar)संभाजीनगर-मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक बनलेले असताना पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (BJP MLA Prashant Bomb)भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची सोमवारी तोडफोड करण्यात आली तर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्याने बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेजारच्या धाराशिवमध्येही संचारबंदी लागू आहे.

आमदार बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 30 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काल बीड जिल्ह्यात हिंसाचाराचा उद्रेक लक्षात घेऊन जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनाचे पडसाद आता विभागातील अनेक जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरातही पोलिस सतर्क आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचा आवाहन करण्यात येत आहे. सोबतच प्रत्येक आंदोलनावर पोलिसांचं लक्ष आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा