
चौक प्रभात शाखेच्या कोजागरीच्या कार्यक्रमात गीतांचा कार्यक्रम
(nagpur)नागपूर,ता.31 संघ स्वयंसेवक आनंद किटकरू आणि आनंद देशमुख यांच्या सुश्राव्य गायनाने चौक प्रभात शाखेतील स्वयंसेवकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या संघगीताने उपस्थितीत ज्येष्ठ व तरूण स्वयंसेवक मंत्रमुग्ध झाले. कोजागरी निमित्त चौक प्रभात शाखेत जुन्या नव्या स्वयंसेवकांचे एकत्रिकरणाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी इतवारी भाग संघचालक संजय शिरपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
(Anand Kitkaru)आनंद किटकरू यांनी ओंकार प्रधान रूप या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर आनंद देशमुख यांनी निर्माणो के पावन युग में, जलते जीवन मैं, हे सूरांनो चंद्र व्हा, जिये देश केल लिए देशहित तर आनंद किटकरू यांनी गायलेल्या अबीर गुलाल, श्रीराम स्तवन, गवळींनो जाऊ नका बाजारी यासारख्या गाण्याने उपस्थित सर्वांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाच्या शेवटी आनंद किटकरू यांनी सादर केलेल्या पंडित बच्छराज व्यास यांनी लिहलेल्या लो श्रद्धांजली राष्ट्रपुरूषा या गाण्याने उपस्थित सर्व ज्येष्ठ स्वयंसेवकांना प.पू गोळवलकर गुरूजींच्या अंत्येष्टीची आठवण झाली.

कार्यक्रमाला जुने स्वयंसेवक संजय (छोटू) खांडवे, मुकुंदा लाभे, (Sunil Mahurkar)सुनील माहूरकर, (Ajay Mundada)अजय मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व स्वयंसेवकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.