तर राज्यातील खासदारांनी राजीनामे द्यावे-उद्धव ठाकरे

0

(mumbai)मुंबई : आरक्षणाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. राज्यात ६-७ केंद्रीय मंत्रीअसताना सर्वसमावेशक आरक्षण देता येत नसेल तर आमचा राजीनामा घ्या, अशी भूमिका केंद्रीय मंत्रिमंडळात मांडली पाहिजे. मंत्रिमंडळाने राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नसतील तर राज्यातील ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा. ही हुकुमशाही तोडून टाकण्याची वेळ आली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

(Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा-धनगर समाजाला समाधानी करणारे आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे. बाकीचे विषय बाजूला ठेवा आणि पंतप्रधानांसमोर आरक्षणाचा विषय मांडण्याचे धाडस केंद्रीय मंत्र्यांनी दाखवावे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा धनगर समाजाला सरकारने आरक्षण द्यावे. केंद्र सरकारच्या हातात हा विषय आहे. जर विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न सुटत असेल तर जरूर घ्यावे. पण केंद्राने तात्काळ संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले. ३१ डिसेंबरपर्यंत आपण अपात्र ठरणार आहोत, हे ज्यांना कळत आहे, ते राजीनामे देताहेत, असेही ते म्हणाले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा