आरोग्य विभागातील 76 कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी दिला डच्चू

0

 

(gondia)गोंदिया -जिल्ह्यातील आरोग्य विभागांमध्ये डाटा ऑपरेटरचे काम करणाऱ्या सर्व 76 उमेदवारांना एकच दिवशी, एकाच तारखेला कामावरून काढण्यासाठी मेल आला असल्यामुळे या डाटा ऑपरेटरवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी याविरुद्ध निवेदन देऊन आम्हाला या पदावर कायम ठेवावे अशी मागणी निवेदनाद्वारा केली.

गेल्या सहा वर्षापासून आरोग्य विभागामध्ये डाटा एन्ट्री करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर कंत्राटी उमेदवाराद्वारे करण्यात येत होते. दोन वर्षापूर्वी या कंत्राटी उमेदवारांना कंपनीद्वारा काम देण्यात आले. एसएसएस या कंपनीने तीन वर्षाचे या कर्मचाऱ्यांकडून कंत्राट तयार करून घेतले .मात्र, तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच या कंपनीने दोन वर्षे झाल्याच्या नंतर सर्व उमेदवारांना एकाच दिवशी मेल पाठवून 20 नोव्हेंबरला कामावरून कमी करत असल्याचे पत्र यांना दिले.

यामुळे मोठा आर्थिक प्रसंग या डाटा एन्ट्री ऑपरेटरपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या विरुद्ध निवेदन देऊन आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आता त्यांच्या मागणीकडे प्रशासन आणि कंपनी कोणती भूमिका घेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा