रामधाम येथे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर

0

 

-चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसरतर्फे आयोजन

(nagpur)नागपूर -चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसरतर्फे मेयो हॉस्पिटल नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टराद्वारे रविवार, २९ ऑक्टोबर रोजी ब्रेस्ट कॅन्सर उपासणी शिबिराचे आयोजन रामधाम तीर्थ (मनसर) येथे करण्यात आले.
उद्घाटन काँग्रेस नेते तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे व रामधामच्या संस्थापिका संध्या चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात आलेल्या महिलांसाठी चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसरतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यावेळी डॉ. अतिश बंसोड, डॉ. रोहन उमालकर, डॉ. प्रमोद, डॉ. नितीन, डॉ. मोक्तिक, डॉ. गणेश, डॉ. संचिता, डॉ. श्रुती डॉ.रितिका यांनी सहकार्य केले. या शिबिराचा १७९ महिलांनी लाभ घेतला. तपासणीत ४ महिलां कॅन्सरग्रस्त असल्याचे समजले. त्यांना पुढील उपचाराबद्दल डॉ. अतिश बसोड यांनी योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी गोपाल कडू, रामटेकच्या माजी नगराध्यक्ष शोभा राऊत, विमल नागपुरे, लक्ष्मण मेंघरे, राहुल पिपरोदे, रामानंद अडामे, कार्तिक उराडे, यशोधरा लांजेवार, राधा यादव, गौतमा राऊत, जयश्री मलघाटे, सरिता जुवार, सोनल मुदलियार अर्चना अमृतकर, आचल लांजेवार, सरिता भरणे, वच्छला शेंडे, वैशाली मेश्राम, लीला राऊत, सोनाली मावळे, संगीता मेश्राम, ज्योती मेश्राम, रीना वाघाडे, सुनीता कुशवाह आदी उपस्थित होत्या..

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा