
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीयांनी कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर टिकेल, अशाच गोष्टी करेल. राजकारण कोणालाही करायचं नाही. यापुढे आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजूही समजून घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा