ठाकरे गटाचे राष्ट्रपतींना निवेदन देण्याचे प्रयत्न

0

मुंबई Mumbai : मराठा व धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ५ किंवा ६ नोव्हेंबरला भेटीची वेळ मागितली आहे.

या पत्रात त्यांनी खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू हे शिवसेना उद्धव ठकरे गटाचे नेते भेटीसाठी जाणार आहेत, असे नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्यागैऱ्यांना बोलावले, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा